मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील शासकीय विश्रागृहावर मुक्ताईनगर तालुका मराठा समाजातर्फे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त प्रतिमा पूजन आणि मराठा समाज दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आज मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आला होता.
सोहळा पार पडल्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी आमदारकी कितीही मोठे पद असले तरी समाजातील ज्येष्ठ मंडळींना वाकून नमस्कार करीत त्यांना तिळ गुळ देवून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा संत मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांच्या देखील पाया पडून त्यांना तिळ गुळ देवून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आणि नात्यातील गोडवा कायम ठेवत आपल्या नात्यातील गोडवा असाच प्रेम रुपी आशिर्वादाने पाठीशी असू द्या अशी विनंती केली.
त्यामुळे यावेळी मकर संक्रांतीनिमित्त राजकीय व सामाजिक गोडवा दिसून आला
“नवीन वर्ष आले की, सर्वजण आधी नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या सणाची मनापासून वाट पाहत असतात आणि तो सण म्हणजे मकर संक्रांती. या दिवशी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन तिळगुळ दिले जातात. आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, असे म्हटले जाते.”