मुक्ताईनगर, पंकज कपले | वाढीव वीज बिल तसेच वीज कनेक्शन तोडणे, एसटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलिनीकरण करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र भरात बहुजन मुक्ती पार्टीतर्फे रावेर लोकसभा प्रभारी प्रमोद सौंदळे यांच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन करण्यात आले.
महावितरण कंपनीने लोकांना वाढीव वीज बिल देणे रीडिंग वेळेवर न घेणे, वाढीव वीज बिलापोटी लोकांचे वीज मीटर काढून घेणे, शेतकऱ्यांना रोहित्र जळाल्यानंतर महिना महिनाभर बसवून दिले जात नाही. तसेच या दिवाळीपासून महाराष्ट्रभरातील एसटी कर्मचारी खाजगीकरणाचा विरोध करून शासनात विलिनीकरणाची मागणी करत आहे. इतक्या दिवसापासून चाललेल्या आंदोलनाची कोणतेही सत्ताधारी पक्षाचे नेतेमंडळी दखल घेताना दिसत नाही, याउलट परिवहन मंत्री वेळोवेळी हायकोर्टाचा दाखला देत एसटी कर्मचाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच पूर्ण खाजगीकरण केले जाईल असा इशारा दिला गेला आहे. परंतु, एसटी कर्मचाऱ्यांसोबत बहुजन मुक्ती पार्टी सदैव खंबीरपणे पाठीशी उभी आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरील आदेश आल्यानंतर आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा प्रभारी प्रमोद सौंदळे यांनी दिला आहे. या आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवी पवार, जिल्हा समन्वयक प्रमोद पोहेकर, विधान सभा प्रभारी राजू वानखेडे, तालुकाध्यक्ष बिजलाल इंगळे, राष्ट्रीय किसान मोर्चा तालुकाध्यक्ष कैलास पाटील, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क तालुका संयोजक सिद्धार्थ हिरोळे, राजेश ढगे, पारस हिरोळे, मनोज पोहेकर, योगेश हिरोळे, राजू कोळी, भगवान कावरे, नितीन गाडे, किशोर धायडे, प्रहारचे डॉ. विवेक सोनवणे, सुरेश पाटील, उत्तम जुमडे, भारत मुक्ती मोर्चाचे अरुण जाधव, अजय इंगळे, जयराज इंगळे, दिपक बोदडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1044231556387815