मुक्ताईनगर,प्रतिनिधी| गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात लक्षणीय वाढ होत आहे. दरात कपात करण्यात यावे म्हणुन केंद्र सरकारच्या विरोधात मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादीतर्फे आंदोलन आंदोलन करण्यात आले.
देशात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस व खाद्यतेल याच्या दरात दिवसागणिक वाढ होत आहे. यामुळे केंद्र सरकारने इंधन दरवाढ तातडीने कपात करावी म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून आज संपूर्ण राज्यात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले. याच धर्तीवर मुक्ताईनगर येथेही राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन हे पंचायत समिती सभापती विकास समाधान पाटील, कृ. उ. बा. स. सभापती निवृत्ती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष शाहिद खान, कार्याध्यक्ष राजेश पाटील ढोले, जि. सरचिटणीस प्रवीण दामोदरे, जि. संघटक उद्धव महाजन, विजे एनटी तालुकाध्यक्ष नितेश राठोड, तालुका सरचिटणीस जितेंद्र तायडे, तालुका संघटक विनोद चव्हाण, तालुका चिटणीस प्रदीप पाटील, सोशल मीडिया तालुका उपाध्यक्ष भूषण धनगर, तालुका कोषाध्यक्ष रवी सुरवाडे, अजय तळेले, विनय पाटील, राहुल पाटील, ललित पाटील, बंटी पाटील, संदीप लिंगे, सागर पाटील, शालिग्राम कांडेलकर, महेंद्र कांडेलकर, सुधाकर मेळे, कांतीलाल चव्हाण व मोठ्या संख्येने पदाधिकारी आदी उपस्थीत होते.