मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरासह तालुक्यातील अवैधधंदे पोलीसांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
मुक्ताईनगर पोलीस मिळणाऱ्या हप्त्याची लिस्ट माजी मंत्री खडसे यांनी अधिवेशनात वाचून दाखवली. त्यानुसार अधिकाऱ्याला साडेपाच लाख रुपये महिन्याला मिळतात. त्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यात अवैध धंदे जोमाने सुरू आहे. पण अधिवेशनात हप्त्याचा विषय गाजल्याने वरिष्ट अधिकारी यांचे वारंवार कारवाईचे दबाव येत असल्याने आपले हप्त्याची लाईन चालू ठेवण्यासाठी छोट्या मोठया व ज्याचा पाठीशी राजकीय वरदहस्त नाही अशा गरीब छोट्या धंदे करणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. आशा कारवाया करून कागदोपत्री केसेस दाखविण्यात येत असल्याचा अफलातून प्रकार सुरू असल्याने मुक्ताईनगर पोलीसाचा करपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. मुक्ताईनगर हद्दीत मोठे हप्ते देणाऱ्या यादीत महामार्गावर फर्नास, काळे ऑइल, तेल व इतर केमिकल अवैध रित्या खरेदी विक्री, विमल, गांजा, सट्टा, पत्ता, चक्री, रेती, दारू, गावठी दारू यांचा रोजचा लाखोंचा उलाढाल होत असून त्यातून पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर हप्ते मिळत असल्याने ते धंदे जोरात सुरू असून याबाबत पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना स्थानिक आमदार वारंवार चार चार दिवसानी रिमांडर समंस करून सुध्दा कारवाई होत नाही. तर सामान्य जनतेला काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.