घरफोडीतील संशयिताला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला शिवाजी नगरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी १३ एप्रिल रोजी दुपारी अटक केली आहे. अटकेतील संशयित आरोपीला पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मोहम्मद नदीम मोहम्मद रफिक (वय-२८) रा. शाह बाजार, बुरहाणपूर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

जळगाव शहरात घरफोडीतील गुन्हेगारांना अटक करण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना दिली. त्यानुसार पथकाला कारवाईच्या सुचना देण्यात आल्या. पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश चोभे, पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, सचिन महाजन, किरण चौधरी, भगवान चौधरी, नंदलाल पाटील, संदीप सावळे, नितीन बाविस्कर, ईश्वर पाटील यांनी गुरूवारी १३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता छत्रपती शिवाजी नगरातील कुवते इस्लामीया मशिदीजवळ छापा टाकून संशयित आरोपी मोहम्मद नदीम मोहम्मद रफिक (वय-२८) रा. शाह बाजार, बुरहाणपूर याला अटक केली. त्याच्याजवळील २ हजार ७५० रूपयांची रोकड, मोबाईल जप्त करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला जळगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content