मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील युनिक इंटरनॅशनल स्कूल येथे आज दिनांक 23 डिसेंबर 22 रोजी किसान दिवस चिमुकल्यांनी अत्यंत उत्साहमध्ये साजरा केला.
प्रसंगी शाळेचे अध्यक्ष मासुळे सर मुख्याध्यापिका जयश्री मासुळे सर्व शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी. शेतकरी राजा आपल्या सर्वांसाठी किती मेहनत करतो हे लहानपणीच मुलांना कळावे म्हणून या कार्यक्रमाचे शाळेने आयोजन केले. आपली कृषी प्रधान संस्कृती आहे. चिमुकल्यांना अगदी लहान वयापासूनच आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून विविध घोषणा देऊन शहरांमध्ये रॅलीचं आयोजन शाळेने केले.