मुंबई : वृत्तसंस्था । इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित एकाची माहिती मिळवण्याची जबाबदारी एका टीमवर सोपण्यात आली आहे. त्याने २०१३ मध्ये अंबानींच्या मरिन ड्राइव्हमधील कार्यालयात धमकीच पत्र पाठवलं होतं. इतर दोन टीम वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चौकशी करत आहेत.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल परिसरातील घऱाजवळ स्फोटक साहित्याने भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. ही कार रोडवर अंबानी यांच्या ‘अॅन्टिलिया’ निवास्थानाजवळ उभी करण्यात आली होती. गाडीत जिलेटिन या स्फोटकांच्या सुट्ट्या कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान घटनेनंतर अंबानींच्या घराबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे तपासदेखील सुरु करण्यात आला आहे.
मुंबई क्राइम ब्रांचने तपास हाती घेतला असून १० पथकं तयार करण्यात आली आहेत. एक टीम परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासणार आहेत. तर दुसरी टीम वाहतूक मुख्यालयाती कॅमेरांमधील फुटेज तपासणार आहे. एक टीम क्रॉफर्ड मार्केटमधील मुंबई पोलीस मुख्यालयातील सीसीटीव्ही तपासणार आहे. चौथी टीम आजुबाजूच्या परिसरातील संशयास्पद लोकांची माहिती मिळवणार आहे. तर एक टीम संशयितांची माहिती मिळवण्यासाठी फॉरेन्सिक टीमच्या संपर्कात आहे.
याशिवाय पोलीस बीएमसी पार्किंगमधील फुटेजची तपासणी करत आहे. येथे आदल्या रात्री एक मसिर्डीज संशयास्पदपणे पार्क करण्यात आली होती. पार्किंगची जबाबदारी असणाऱ्याची पोलीस चौकशी करत आहेत.
दरम्यान गाडीमध्ये “ये तो ट्रेलर है” अशा आशयाचं पत्र पोलिसांना सापडलं आहे. तसंच अंबानी यांच्या ताफ्यातील आणखी काही गाड्यांच्या नंबर प्लेट पोलिसांना सापडल्या असल्याची माहिती समोर येत आहे.