जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग पु.ल. देशपांडे अकादमीच्यावतीने दरवर्षी पु.ल. महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात संजिवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन जळगाव संस्थेचा खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी कविता आणि गाण्यांचा अरे संसार संसार या कार्यक्रमाची निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य विभाग पु.ल. देशपांडे अकादमीच्यावतीने मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे 18 नोव्हेंबर 2022 रोजी अकादमीच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. महाराष्ट्र शासनाचा हा महत्वाचा उपक्रम आहे. शासनाच्या महोत्सवात परिवर्तनची निवड हा खान्देशचा सन्मान आहे. बहिणाबाईच्या कवितेचा कार्यक्रम अरे संसार संसारचा हा रौप्यमहोत्सवी प्रयोग असून हा प्रयोग मुंबईत होतो आहे. या कार्यक्रमाची संकल्पना विजय जैन यांची असून दिग्दर्शन हर्षल पाटील यांचे आहे. निर्मिती प्रमुख नारायण बाविस्कर आहेत. आतापर्यंत मुंबई, पुणे, कोल्हापूर, कणकवली, जामनेर, धुळे अशा अनेक ठिकाणी एकूण २४ प्रयोग झाले आहेत. परिवर्तनच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून परिवर्तनचे अभिनंदन होत आहे