मुंबई-पुण्यासह ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये उद्यापासून दारू विक्रीला परवानगी

मुंबई (वृत्तसंस्था) कंटेन्मेंट झोन वगळून मुंबई-पुण्यासह ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्यापासून दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी यासंदर्भात माहिती दिली.

 

‘कोरोना’चा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह १४ जिल्हे ‘रेड झोन’मध्ये आहेत. सुरुवातीला केवळ ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये मद्य विक्रीला सशर्त परवानगी होती, मात्र आता ग्रीन, ऑरेंज आणि रेड या तिन्ही झोनमध्ये, बाजारपेठा आणि मॉलमध्ये नसलेल्या अशा स्वतंत्र मद्यविक्री दुकानांना परवानगी मिळाली आहे. परंतू यासाठी काही अटी घालून देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार ग्रीन, ऑरेंज व रेड या तिन्ही झोनमध्ये, बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या, स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांना परवानगी राहणार आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून ६ फुटांचे अंतर राखावे लागणार आहे. तसेच एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही सुनिश्चित करावे लागणार आहे.

Protected Content