मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी भाई जगताप, शेट्टी, चव्हाण यांच्या नावांची चर्चा

 

मुंबई ; वृत्तसंस्था । मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे आ. भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी आ. मधु चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, आ. अमीन पटेल, चरणसिंह सप्रा अशी नावे चर्चेत आहेत

राज्यातील सत्तेचा वापर काँग्रेसची पक्ष संघटना वाढीसाठी करण्याची गरज असल्याचे पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांतील मुंबई काँग्रेसच्या गटबाजीच्या राजकारणाला मुठमाती देऊन मुंबईतील पक्ष संघटना वाढविण्याचा भाग म्हणून पक्षाचे मुंबई नेतृत्व बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षसंघटना वाढीवर भर दिला असून, मुंबईत काँग्रेसला मानणारा वर्ग काही प्रमाणात असला, तरी त्यांच्यापर्यंत संघटनेच्या माध्यमातून जाणे आणि आगामी महापालिका निवडणुकासाठी पक्षाची तयारी करणे यासाठी विद्यमान अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या जागी नवीन व्यक्तीची नेमणूक व्हावी, असा काहींचा आग्रह आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मुंबईसह कोकणात दारूण पराभव झाला. मुंबईतील पक्षाची कामगिरी बरी न झाल्यामुळे माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली होती.

 

Protected Content