मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले !

मुंबई (वृत्तसंस्था) शानिवारी रात्री मुंबईला मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर आज सकाळपासूनच पावसाने झोडपायला सुरुवात केली आहे. आज मुंबईत साडेबाराच्या सुमारास भरती येण्याची शक्यता आहे.

 

मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरातील विविध भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. उपनगरातील कांदिवली, मलाड, बोरीवली भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पाऊसाची बाब लक्षात घेत महापालिकेने २४ विभागांना दक्षतेचा इशारा दिला आहे. काल दिवसभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबापुरीचा वेग मंदावल्याचं पाहिला मिळालं. हवामान खात्याच्या वतीने तीन दिवसांपुर्वी ऑरेंज अलर्ट जाहिर केला होता तर काल रेड अलर्ट जाहिर करण्यात आला होता. त्यानुसार मागील दोन दिवस मुंबईला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. काल रात्री 8.30च्या तब्बल 132 मिमी पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे.

Protected Content