मुंबई वृत्तसंस्था । मुंबईच्या रेड झोनमधील कोरोनाबाधितंची संख्या दुप्पट होण्याचा वेग १२ दिवसांवर आला आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत असून मुंबईत रुग्णसंख्या अधिक आहे. त्यामुळे प्रशासनासह मुंबईकरांची चिंताही वाढली आहे. विशेष म्हणजे महापालिकेचे ५ वॉर्ड असे आहेत, ज्यात प्रत्येकी दोन हजाराहून अधिक रुग्ण आहेत.
राज्यात कालच्या दिवसात २ हजार ९१ नवे ‘कोरोना’ रुग्ण आढळले. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ५४ हजार ७५८ वर पोहोचला आहे. तर काल दिवसभरात आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे ९७ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या १७९२ वर पोहोचली आहे. काल ११६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या कोरोना रुग्णांची संख्या १६ हजार ९५४ इतकी झाली आहे. सध्या ३६ हजार ४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.