मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवले


मुंबई (वृत्तसंस्था)
आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा होत असतांना दुसरीकडे केंद्र सरकारने मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) हे गुजरातला हलवण्याचा घेतला आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये (बीकेसी) प्रस्तावित असलेले हे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र आता गुजरातमधील गांधीनगर इथे होणार आहे. दरम्यान, यामुळे महाराष्ट्रातील जवळपास 2 लाख नोकऱ्यांची संभाव्य संधी गुजरातकडे गेली आहे.

 

2006 मध्ये जागतिक बँकेचे अर्थतज्ज्ञ पर्सी मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मुंबईत आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र सुरु करण्याची शिफारस केली होती. वेगवेगळे टाईम झोन पाहता मुंबईचे स्थान जगातील इतर दोन आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र असलेल्या सिंगापूर आणि लंडनच्या बोरबर मध्ये आहे. त्यामुळे मुंबई हे योग्य ठिकाण असल्यामुळे तसेच मुंबईचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन हे केंद्र मुंबईला सुरु करण्याचा निर्णय त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतला होता. मात्र, केंद्राने आता हे केंद्र गुजरातला हवलण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्का आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय सेवा केंद्रामुळे आर्थिक क्षेत्रात थेट 1 लाख नव्या नोकऱ्यांच्या संधी तयार होणार होत्या. तसेच याच्याशी संबंधित अप्रत्यक्ष आणखी 1 लाख नोकऱ्यांचीही संधी तयार होणार होत्या. आता हे आर्थिक केंद्रच गुजरातमध्ये हलवण्यात आल्याने महाराष्ट्रातील या नव्या नोकऱ्यांच्या संधी हुकली आहे.

Protected Content