जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मुंदडानगर येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याबाबत बुधवार २३ नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजता पतीसह सासरच्या मंडळी विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील महाबळ कॉलनी येथील माहेर असलेल्या मीनाक्षी महेश बारी (वय-२६) यांचा विवाह शहरातील मुंदडा नगरात राहणारे महेश बारी यांच्याशी रीतीरीवाजानुसार २०२१ मध्ये झाला. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले, त्यानंतर पती महेश बारी याने किरकोळ कारणावरून विवाहितेला टोमणे मारणे व मारहाण करण्यास सुरू केली. त्यानंतर काहीही कारण नसताना विनाकारण मारहाण करणे, शिवीगाळ करणे व जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच सासू, सासरे, नणंद यांनी देखील मारहाण करण्यास प्रोत्साहन दिले. या छळाला कंटाळून माहेरी निघून आल्या. बुधवार २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता विवाहितेच्या फिर्यादीवरून पती महेश लोटन बारी, सासू आशा लोटन बारी, सासरे लोटन गडबड बारी तिघे रा. मुंदडा नगर पिंपराळा जळगाव ननंद रंजना भरत बारी रा. यावल, नणंद कविता आकाश चांदेकर आणि करुणा सचिन नागपुरे रा. पुणे यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी करीत आहे.