मुंगसे येथून धरणगावात आलेला व्यक्ती तपासणीसाठी जळगावला रवाना ; ‘होम क्वारंटाईन’ची प्रक्रिया सुरु

धरणगाव (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील एका ६० वर्षीय महिलेचा कोरोना व्हायरसचा  रिपोर्ट काल पॉझेटिव्ह आला होता. या पार्श्वभूमीवर मुंगसे येथून धरणगावात आलेल्या एका व्यक्तीला जळगाव येथे तपासणीसाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती तहसीलद नितीनकुमार देवरे यांनी दिली आहे. तूर्त त्या व्यक्तीत कोणत्याही प्रकारच्या आजाराची लक्षण दिसून आली नाहीत. परंतू जिल्हा प्रशासनाने मुंगसे गावालगत असलेला ७ कि.मी.परिसर ‘बफर झोन’मध्ये घेतलेला आहे. त्यामुळे या व्यक्तीला ‘होम क्वारंटाईन’ करण्याचे आदेश काढण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचेही  तहसीलदार श्री. देवरे यांनी सांगितले.

 

धरणगाव येथील संभाजी नगरात राहत असलेल्या एका इसमाची मुंगसे गावाला शेती आहे. शेतीचे कामानिमित्त त्याचे मुंगशी येथे जाणे येणे असते. काल तो मुंगसे नेहमीप्रमाणे शेतीकामासाठी गेला होता असे समजते. तेथील महिलेला कोरोना झाल्याची माहिती त्याने त्याच्याच परिसरात राहणाऱ्या लोकांना गप्पा मारत दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी जागृती दाखवत ही माहिती प्रशासनाला कळविली. यानंतर त्याला धरणगाव पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. मात्र, त्याने आपण तपासणी केलेली आहे अशी माहिती पोलिसांना दिली. या संदर्भात सहा.पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की, संबंधित व्यक्तीला जळगाव येथे जावून तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्याने आपण तपासणी केलेली आहे, अशी माहिती पोलिसांना दिली आहे. मात्र, शेती कामासाठी गेलेल्या या इसमाने केव्हा तपासणी केली? हा मोठा प्रश्न आहे.

 

सदर व्यक्तीने मुंगसे येथून धरणगावात आल्यावर त्याच्या कॉलनीतील लोकांशी या घटनेविषयी गप्पा मारल्या आहेत. वास्तविक बघता प्रशासनाने त्याला तात्काळ तपासणीसाठी जळगाव रवाना करणे गरजेचे होते. मात्र, यात दिरंगाई झाल्याचे उघड आहे. याबाबत तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगीतले की, ग्रामीण रुग्णालयात संबंधित व्यक्तीची धरणगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. तरी देखील पुढील काळजी म्हणून त्याला जळगाव येथे पाठविण्यात येत आहे. त्याठिकाणी तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी योग्य तो निर्णय घेतील. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी या व्यक्तीला ‘होम क्वांरीटाईन’ करण्याचे आदेश काढत असल्याचेही तहसीलदार श्री.देवरे यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे धरणगाव शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Protected Content