अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील मुंगसे येथील वृध्द महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर रात्रीच मुंगसेसह परिसरातील गावे सील करण्यात आली असून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
काल रात्री जळगाव जिल्हा रूग्णालयात कोरोनाची संशयित म्हणून दाखल झालेल्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे वृत्त येताच खळबळ उडाली. संबंधीत महिला ही अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील रहिवासी आहे. तिचा मुलगा काही दिवसांपूर्वी पुणे येथून आला होता. त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. यानंतर तिला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिचा स्वॅप नमूना चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. या चाचणीचा रिपोर्ट आता पॉझिटीव्ह आला आहे.
दरम्यान, रात्री प्रांताधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यात मुंगसेसह परिसरातील दापोरी खुर्द, रूंधाटी आणि सावखेडा या गावांना सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्रीच या चारही गावांच्या सीमा सील करण्यात आल्या असून बाहेरच्या व्यक्तींच्या प्रवेशाला येथे मज्जाव करण्यात आला आहे. या चारही गावांमध्ये फवारणीसह अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील सुरू करण्यात आल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००