नंदुरबारच्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचा भुसावळशी संबंध

भुसावळ प्रतिनिधी । नंदुरबार येथे शुक्रवारी कोरोना पॉझिटीव्ह ठरलेला रूग्ण काही दिवसांपूर्वी भुसावळ येथे येऊन गेल्याची माहिती मिळाल्याने प्रशासनाने याबाबत तपास सुरू केला आहे.

आजवर नंदुरबार येथे कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. तथापि, शुक्रवारी सायंकाळी एका रूग्णाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा रूग्ण गत काही दिवसांमध्ये नेमका कुणाकुणाच्या संपर्कात आला ? याची माहिती पोलीस यंत्रणेने जमा केली. यात तो भुसावळ येथे येऊन गेल्याची माहिती समोर आली. नंदुरबारच्या पोलिसांनी याबाबत भुसावळ पोलिसांना माहिती दिली.

या अनुषंगाने डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत आणि पोलिस कर्मचार्‍यांनी सायंकाळी चौकशी सुरू केली. माहितीच्या आधारावर पथकाने सिंधी कॉलनी व तेथून ग्रीन पार्क परिसरात चौकशी केली. रात्री उशीरापर्यंत ही चौकशी सुरू होती. याबाबत अद्याप पोलीस प्रशासनातर्फे अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, नंदुरबारचा कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण भुसावळात येऊन गेल्याची माहिती समोर आल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content