मुंबई । टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्ही व इतर चॅनेल्सना मीडिया ट्रायल न घेण्याचे तसेच समांतर तपास करू नये अशी मागणी राज्य सरकारने उच्च न्यायालयात धाव केली आहे.
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलीस चुकीच्या पद्धतीने चौकशी करत असल्याचा आरोप करत हंसा रिसर्च ग्रुप या कंपनीने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
यावेळी राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना प्रकरण न्यायप्रविष्ट असताना रिपब्लिक टीव्ही व अन्य वृत्त वाहिन्या मीडिया ट्रायल तसेच त्या प्रकरणाचा समांतर तपास करीत आहेत. या खटल्याची सुनावणी सुरू असताना टीव्ही चॅनेल साक्षीदारांना बोलवत आहे. त्यामुळे किमान पुढील सुनावणीपर्यंत तरी या चॅनेल्सवर बंदी घालावी. अशी मागणी सिब्बल यांनी केली आहे.