अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अमळनेरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांची ‘उत्कृष्ट तहसिलदार’ म्हणून निवड केली आहे.
त्यांचा कार्यकाळात वर्षभरातील विविध योजना राबविणे, योग्य नियोजन, प्रभावी व उत्तम कामगिरी केल्याबद्दल येत्या १ ऑगस्ट रोजी जळगाव येथे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा हस्ते त्यांना सन्मानित केले जाणार आहे. या उत्कृष्ट कामगिरी बद्दल तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
दरम्यान सदर गौरव सोहळा हा 1ऑगस्ट ला 4 वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते नियोजन भवनात देण्यात येणार आहे.
अभिमान गोष्ट म्हणजे अमळनेर तालुक्याला साधारण 8 ते 9 वर्षानंतर हा बहुमान मिळत असल्याचे बोलले जात आहे. उत्कृष्ट अधिकारी म्हणून मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार तर उत्कृष्ट कर्मचारी म्हणून महसूल सहाय्यक जगदीश पाटील यांचा देखील समावेश आहे.