कोलकाता : वृत्तसंस्था । पश्चिम बंगाल भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची अंतिम यादी आज जाहीर केली. यात १३ नावे आहेत परंतु मिथुन चक्रवर्ती यांचे नाव नाही. राश्बेहारी ही जागा मिथुन चक्रवर्तींसाठी राखीव ठेवण्यात येईल असे वाटत होते.
पक्षाने या जागेवरून कश्मीर येथे निर्णायक भूमिका निभावणारे लेफ्टनंट जनरल सुब्रत साहा यांना उमेदवारी दिली आहे. दक्षिण कोलकातामधील ही प्रतिष्ठित जागा चक्रवर्ती यांच्यासाठी ठेवण्यात येत असल्याचे भाजपच्या सूत्रांनी आधी सांगितले होते.
७मार्च रोजी कोलकाता येथे झालेल्या भाजपाच्या ब्रिगेड परेड ग्राऊंड मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी प्रमुख भाजपात प्रवेश केला होता.
त्याच ठिकाणी अभिनेत्याने बंगाली चित्रपट आमदार फटाकेश्टो मधील आपली लोकप्रिय ओळ म्हटली होती: “मी तुला येथे मारले तर तुझे शरीर स्मशानभूमीत जाईल.” त्या दिवशी त्यांनी निवडणूकीसाठी नवीन लाईन देखील दिली: “मी निरुपद्रवी पाण्याचा साप किंवा निरुपद्रवी वाळवंटातील साप नाही. मी एक कोब्रा आहे. एकाच दंशाने मी तुला संपवून टाकेन.”
मुख्य म्हणजे अलीकडच्या आठवड्यात त्यांनी मुंबईतून आपले मतदान कार्डात बदल करून कोलकाता येथून मतदार म्हणून नावनोंदणी केली होती. तथापि या क्षणी तरी निवडणूक लढविण्याच्या त्यांची इच्छा ही इच्छाच राहताना दिसत आहे. परंतु एखाद्या उमेदवाराच्या जागी कदाचित ते निवडणुकीच्या मैदानात उतरतील देखील. बंगालमधील मतदान आठ टप्प्यात पार पडणार असून अंतिम टप्प्यासाठी उमेदवारी दाखल करण्यची अंतिम तारीख एप्रिलच्या मध्यापर्यंत आहे.
त्यांच्या चाहत्यांसाठी म्हणून श्री चक्रवर्ती ३० मार्च रोजी सुवेन्दु अधिकारी यांच्यासाठी नंदीग्राममध्ये प्रचार करणार आहेत. त्या रोड शोमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.