मिठी नदीत सापडलेली नंबरप्लेट औरंगाबादच्या कारची

 

मुंबई : वृत्तसंस्था । मिठी नदीतील शोध मोहिमेत एन आय ए ला सापडलेली (एमएएच-२० एफपी १५३९) ही नंबरप्लेट ही औरंगाबादमधील एका व्यक्तीच्या चोरी गेलेल्या कारची असल्याची माहिती आता समोर आली आहे.

 

 

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी  राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बीकेसी परिसरात मिठी नदीच्या पात्रात शोध मोहीम राबवली. यावेळी नदी पात्रातून एक कॉम्प्यूटर, सीपीयू, दोन नंबर प्लेट्स आणि आणि अन्य साहित्य हाती लागलं .

 

 

औरंगाबादमधील हडको एन १२ छत्रपती नगर येथील रहिवासी असलेले विजय मधुकर नाडे यांनी ही नंबर प्लेट आपल्या चोरी गेलेल्या कारची असल्याचा दावा केला आहे. तसेच, १६ नोव्हेंबर २०२० रोजी माझी कार औरंगाबाद येथून उद्धवराव पाटील चौकातून चोरी गेली होती. ज्यानंतर मी सिटी चौक पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. माझ्याकडे त्याची एक प्रत देखील आहे. तीन महिने कारचा काहीच पत्ता लागला नाही, पण काल मला याबाबत फोन आला होता. असं विजय नाडे यांनी म्हटलेलं आहे.

 

‘एनआयएची टीम रविवारी सचिन वाझेंना घेऊन मिठी नदीपात्रात शोध मोहिमेसाठी पोहचली होती. यानंतर काही जण नदी पात्रात उतरले व मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने लॅपटॉप, सीपीयू, डीव्हीआर मशीन, प्रिंटर आणि दोन नंबर प्लेट्स शोधून काढल्या. तर, या अगदोर एनआयएची टीम सचिन वाझेंना घेऊन वांद्रे परिसरातील खाडीजवळ तपासासाठी आली होती. यावेळी एनआयएचे एसपी विक्रम खलोट हे देखील उपस्थित होते.

Protected Content