पाचोरा, प्रतिनिधी | माहिजी देवी यात्रोत्सवाला सामाजिक कार्यकर्त्या प्रा. अस्मिता पाटील यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.
माहीजी या गावातील मायजी देवीच्या यात्रोत्सवाची पूर्वीपासून परंपरा असून या माहिजी येथील देवीची यात्राही दरवर्षी सालाबाद प्रमाणे भरत असतो. मागील दोन वर्षापासून कोरोना काळात यात्रोत्सवास परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र यावर्षी माहिजी देवीची यात्रा उत्साहाने भरली असुन ही यात्रा येत्या १५ दिवस उत्साहात पार पडणार आहे. या यात्रेमध्ये जळगाव जिल्ह्यातील दर्शनासाठी भक्तगण या देवीची आराधना करुन आपली मनोकामना पूर्ण करत आहेत. या यात्रेमध्ये अनेक राजकीय पुढारी तसेच सामाजिक कार्यकर्ते दर्शनासाठी येत असतात.
या यात्रेत उत्साहाचे वातावरण असून या यात्रेचे या वर्षाचे पूजेचे मानकरी माजी खासदार ए. टी. पाटील व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी या यात्रेस सामाजिक कार्यकर्ता अस्मिता पाटील यांनी देवी माताचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत माहीजी या गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, पुरुष, महिला, बालगोपाल उपस्थित होते.