Home क्राईम मास्टर कॉलनीत उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर गुन्हे

मास्टर कॉलनीत उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर गुन्हे

FIR


जळगाव प्रतिनिधी । शहरातील मास्टर कॉलनी परीसरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या पाच जणांवर पोलीसांनी कारवाई करत एमआयडीसी पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील मास्टर कॉलनी परीसरात शेख शोएब फिरोज (वय-२०) रा. अक्सा नगर, मेहरूण, शेख आकिब शेख आरीफ कुरेशी (वय-१९) रा. मास्टर कॉलनी, मेहरूण, अस्लम खान गणी खान (वय-४५) रा. भवानी पेठ, तौसीफ यासीन शेख (वय-३१) रा. बालाजी पेठ, भिलपूरा, युनुसखा अब्दुल रहेमान कुरेशी (वय-५२) रा. भिलपूरा भवानी पेठ हे उघड्यावर मांस विक्री करत असतांना आढळून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. अतुल वंजारी, स.फौ. आनंदसिंग पाटील, स.फौ. रामकृष्ण पाटील, पो.कॉ. गोविंदा पाटील, पो.कॉ. सचिन पाटील पो.कॉ. असीम तडवी, पो.कॉ. इम्रान अली सैय्यद, पो.कॉ. योगेश बारी यांनी कारवाई केली.


Protected Content

Play sound