मास्क , सोशल डिस्टन्सिंगमुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत?

 

 

लंडन : वृत्तसंस्था । कोरोना महामारीत सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर यामुळे  लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याचं आता समोर आलं आहे. इंग्लंडमधल्या काही तज्ज्ञांनी याबद्दलचा अभ्यास केला आहे.

 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गेल्या १५ महिन्यांपासून ज्या मुलांना कोणत्याही संसर्गजन्य फ्लुची लागण झालेली नाही, अशा मुलांमध्ये त्याच्याशी लढण्यासाठीची रोगप्रतिकाशक्ती तयार झालेली नाही. त्यामुळे त्यांचं शरीर अशा पद्धतीच्या संसर्गजन्य विषाणूंशी लढण्यासाठी सक्षम नाही.

 

तज्ज्ञांना RSV या फुफ्फुसांच्या संसर्गाच्या धोक्याची शक्यता वाटत आहे. या संसर्गामुळे फुफ्फुसांना धोका निर्माण होतो आणि मृत्यूचा धोकाही संभवतो. एक वर्षे वयाच्या आतील मुलांना हा संसर्ग होऊ शकतो अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

त्यांनी असंही सांगितलं की, कोरोना प्रादुर्भावाच्या पूर्वी अनेक लहान मुलांना अशा प्रकारचा संसर्ग झाला आहे. मात्र, कोरोनाकाळात मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळल्यामुळे अशा संसर्गापासून मुलांचं संरक्षण झालं.

 

मात्र भविष्यात ज्यावेळी मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचं पालन करणं बंद होईल, त्यावेळी लहान मुलांना पुन्हा RSV संसर्गाचा धोका उद्भवू शकतो. कारण, या कोरोनाकाळात मास्क, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केल्याने लहान मुलांना इतर संसर्गजन्य आजार झाले नाहीत आणि त्यामुळे त्या आजारांशी लढण्यासाठी त्यांच्या शरीराने रोगप्रतिकारशक्ती तयार केलीच नाही.

 

Protected Content