मालेगाव (वृत्तसंस्था) मालेगावात गेल्या 24 तासात तब्बल 42 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. धक्कादायक म्हणजे यात एकाच कुटुंबातील 8 सदस्यांचा समावेश आहे.
एकट्या मालेगावमधील कोरोना रुग्णांची संख्या 661 वर जाऊन पोहचली आहे. मालेगाव शहरात एकाच कुटुंबातील 8 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मालेगावमध्ये आतापर्यंत ‘कोरोना’मुळे बळी गेलेल्या रुग्णांचा आकडा 40 झाला आहे. तर एकूण 469 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, राज्य सरकारने काल जाहीर केलेल्या चौथ्या लॉकडाऊनच्या नियमानुसार मालेगाव महापालिका क्षेत्र रेड झोनमध्ये आहे.