जळगाव प्रतिनिधी । शहरातील शनीपेठ, बळीराम पेठ, भवानी पेठ, काट्या फैल, इस्लाम पुरा, जोशी पेठ, मन्यार मोहल्ला व शिवाजी नगर परिसरात मालेगाव शहरात कोरोना नियंत्रणात आणणार्या तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली. या शिबिराचा रविवारी १३०० वर नागरीकांनी लाभ घेतला.
कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी माजी उपमहापौर करीम सालार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी शनीपेठ, बळीराम पेठ, भवानी पेठ, काट्या फैल, इस्लाम पुरा, जोशी पेठ, मन्यार मोहल्ला व शिवाजी नगर परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी तसेच कोरोना संशयीत रुग्णांचा शोध घेण्यासाठी शिबीर घेण्यात आले. दोन दिवसापूर्वी परिसरातील युवकांच्या मदतीने सर्दी, खोकला, ताप सारखी लक्षणे असलेल्या रुग्णांच्या शोधार्थ आवाहन करण्यात आले होते. ज्या रुग्णांना एक्सरे ची गरज होती त्या रुग्णांना अलफैज फौंडेशन तर्फ मोफत एक्सरे काढून देण्यात आले. मालेगाव येथे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार्या तज्ञ डॉक्टरांच्या पथकाला यादी तयार करण्यात आली आहे. यानुसार आज शहराच्या विविध भागांमधील तब्बल १३०० रूग्णांची तपासणी करण्यात आली असून यातील रूग्णांवर औषधोपचार करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये शहरातील उर्वरित भागात ही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.