जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील मालदाभाडी येथील एका २२ वर्षीय तरूणाने घरगुती कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी जामनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, चेतन संभाजी कापसे (वय २२) रा. मालदाभाडी ता. जामने या तरूणाने मालदाभाडी स्टार्च फॅक्टरी परीसरातील वसाहतीच्या घरामध्ये घरघुती कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली. घटने बाबत पोलीस ठाण्यात पोलीस पाटील ज्ञानेश्वर खराटे यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार संजय पाटील करीत आहे.