यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील मारूळ येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या आर्थिक गोंधळलेल्या दुर्लक्षीत कारभारामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून शासनास आर्थिक भुर्दंडास कारणीभुत असलेल्या कारभारींची सविस्तर चौकशी करा या मागणीसह १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत अपहार झाल्याबद्दलची तक्रार निवेदनाद्वारे शहादत अली मंसुर यांनी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
यावल तालुक्यातील मारुळ ग्रामपंचायतमध्ये विविध विकास कामांच्या माध्यमातुन लाखो रूपयांचा अपहार झालेला आहे. तालुक्यातील मारूळ गाव हे सातपुडयाच्यlपायथ्याशी असुन या गावाची लोकसंख्यांही १० हजाराच्यावर आहे. मात्र गावाची स्वच्छता निव्वळ नावाला कागदावरच आहे.
मारूळ गावातील गटारीतील घाणीमुळे तुंबल्याने दुर्गंधीचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. या सर्व दुर्लक्षित निष्काजीपणाचे भोंगळ कारभारास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. संपुर्ण गावाला पाणी पुरवठा करणाऱ्यl जलकुंभा जवळ सर्वत्र अस्वच्छता पसरलेली आहे. या जलकुंभास संरक्षण भिंत नसून जलकुंभाच्या वरती झाकण नसल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मारूळ ग्राम पंचायतच्या वतीने आजतगायत मासिक सभा झालेली नसल्या चित्र असुन , पंचायतच्या दैनंदिन कामकाजच्या प्रोसिडींग मध्ये खोडखोड केलेली दिसुन येत आहे. तरी गटविकास अधिकारी यांनी या सर्व गोंधळलेल्या कारभाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान मारूळ ग्रामपंचायतीच्या वतीने शेतसा-याचा लिलाव १५/०२/२०२० ला झालेला होता. १० लाख रूपये शेत साऱ्याच्या माध्यमातुन मिळालेल्या रक्कम परस्पर विल्हेवाट लावलेली आहे. गावत विविध ठिकाणी ग्रामपंचायतच्या अधिकार क्षेत्रातील शासकीय जागेवर मोठया प्रमाणावर अतिक्रमण करण्यात येत असतांना ग्रामपंचायत बघ्याची भूमिका घेत आहे. अशी तक्रार निवेदनाद्वारे केली आहे.
शहादत अली मंसूर अली यांनी दि. २९/०९/२०१६ ला माहिती मिळविण्याचा अधिकार नियम प्रमाणे माहिती मागितली होती ती मला आजपावेतो मिळालेली नसल्याची माहीती त्यांनी दिली आहे . तरी या सर्व मारूळ ग्रामपंचायतीच्या आर्थिक भोंगळ कारभाराची आपण तात्काळ सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी शहादत अली यांनी निवेदनाद्वारे केली आहे.