अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नीम येथील विवाहितेने आपल्या चिमुकलीसह आत्महत्या केली होती. तिला आत्महत्या केल्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, ४ ऑक्टोबर २०२२ रोजी तालुक्यातील कळमसरे शिवारात निम येथील विवाहितेने मुलीसह विहिरीत उडी ठाकून आत्महत्या केल्याची घटना ऑक्टोबर महिन्यात घडली होती.. कळमसरे निम रस्त्यावर समबस्टेशन जवळ असलेल्या विहिरीत
निम येथील समाधान जहांगीर कोळी याची पत्नी व मुलगी या मायलेकीचा मृतदेह आढळून आला होता.
या प्रकरणी आता पती समाधान कोळी याने एकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. यात गावातील अशोक गटलू कोळी यासम मृत विवाहितेने दिलेली ५ ग्रॅम वजनाची सोन्याची बाही त्याने परत केली नाही. तसेच संबंध ठेवण्याम नकार दिल्याने फोटो आणि व्हॉईस रेकॉर्डींग व्हायरल केल्याची धमकी दिल्यामुळे सदर विवाहितेने आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. त्यावरुन अशोक गटलू कोळी याच्याविरुद्ध मारवड पोलीसात भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो. उ. नि. बाळकृष्ण शिंदे करीत आहेत.