पुणे प्रतिनिधी । मातोश्रीवर जाण्यात कसलाही कमीपणा नसल्याचे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी नुकतीच मातोश्रीला भेट देण्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला मारला होता. पवार यांना वारंवार मातोश्रीवर भेटायाला बोलावणे योग्य नसल्याचे ते म्हणाले होते. यावर आज पुणे येथील पत्रकार परिषदेत पवार यांनी मातोश्रीवर जाण्यता कसलाही कमीपणा नसल्याचे स्पष्ट केले. पारनेर मधील नगरसेवक फुटीचा मुद्दा किरकोळ असल्याचे सांगत त्यांनी आपण ठाकरे सरकारच्या कामावर समाधानी असल्याचे सांगितले. दरम्यान, पुण्यातील व्यापार्यांसाठी पुण्याजवळ जागा उपलब्ध करून तेथे एक व्यावसायिक केंद्र बनवावे अशी मागणी केली. व्यापार्यांनी ही मागणी केली असून ती अर्थव्यवस्थेला गतीमान करण्यासाठी योग्य असल्याचे ते म्हणाले.