पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली गाठून सामाजिक न्याय व सक्षमीकरण केंद्रीय राज्यमंत्री के. नारायण स्वामी यांना याबाबत निवेदन दिले.
तालुक्यातील अनुसुचीत जातीसाठी उपलब्ध आरक्षणाची अ, ब, क, ड वर्गीकरण करुन मातंग समाजाच्या १२ पोटजातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण प्रदान करण्यात यावा, जगद् विख्यात साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात यावा, आद्यक्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे यांना राष्ट्रिय महापुरुषांच्या यादी मध्ये नाव समाविष्ठ करण्यात यावा, अनु.जाती सवर्गातील दुर्लक्षीत घटकांसह मातंग समाजाला सामाजीक न्याय व विशेष संधी उपलब्ध करुन देण्यासाठी साहित्य सम्राट डॉ. अन्नाभाऊसाठे शिक्षण प्रशिक्षण व संशोधन संस्था स्वतंत्रपणे तात्काळ सुरु करण्यात यावी. आदी मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली गाठले. आणि तात्काळ वरील मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी सामाजिक न्याय व सक्षमीकरण केंद्रीय राज्यमंत्री के. नारायण स्वामी यांना निवेदन दिले.
याप्रसंगी प्रकाश कांबळे, अंबादास अल्हाट, सुभाष पगारे, समाधान बोराडे, रविंद्र खैरनार, सचिन कांबळे, फकिरा गायकवाड आदी उपस्थित होते.