एरंडोल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वनकोठे येथील तरुणाच्या बँक खात्यात लातूर जिल्ह्यातील व्यापाऱ्याकडून नजरचुकीने पैसे पाठविले गेले होते. तरुणाने व्यापाऱ्याच्या खात्यात पैसे पुन्हा परत पाठविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रहिवासी असलेले अंतेश्वर बळीराम धुमाळे नामक एका व्यापाऱ्याकडून वनकोठे येथील रहिवासी संदिप गुलाबराव वाघ यांच्या बँकेच्या खात्यावर नजरचुकीने एकूण १६ हजार रुपये रक्कम पाठवली गेली होती. काही तासानंतर त्या व्यक्तीचा वाघ यांना फोन आला व माझ्याकडून तुमच्या खात्यावर नजरचुकीने काही रक्कम पाठवली गेली आहे कृपया ती मला परत कराल का ? म्हणून विचारणा केली. यावेळी संदिप वाघ यांनी क्षणाचा विलंब न करता संबंधित व्यक्तीला आपल्या बँक खात्यात नजर चुकीने आलेले १६ हजार रुपये त्यानी दिलेल्या खात्यावर परत पाठवले. वाघ यांचा प्रामाणिकपणा पाहून व्यापाऱ्याने आनंद व्यक्त करून आभार त्यांचे मानले आहेत.