मुक्ताईनगर विकास सोसायटीच्या चेअरमनपदी राजू माळी 

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मुक्ताईनगर सह पाच गावे मिळून सर्वात मोठी असलेली विविध कार्यकारी सह. सोसायटी चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष राजू माळी यांची निवड करण्यात आली.

वाईस चेअरमन पदी नुकतेच शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले प्रशांत (बाळा) भालशंकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की मुक्ताईनगर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक पदाची निवडणूक बिनविरोध झाली होती यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्विवाद वर्चस्व राखले होते आज चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवडणूक बिनविरोध पार पडली यात अनुक्रमे राजू माळी व प्रशांत (बाळा)भालशंकर यांची निवड करण्यात आली.

यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर राहणे, माजी चेअरमन संचालक पुरुषोत्तम महाजन, बंटी जैन, वसंता तळेले, विनोद सोनवणे, श्रावण तळेले, संदीप जावळे, चंद्रकांत भोलाने, माजी सभापती विकास पाटील, माजी सरपंच प्रवीण पाटील, बापू ससाने, आदीसह सर्व संचालक उपस्थित होते.

चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र (भैय्या) पाटील, वस्त्रोद्योग महामंडळाच्या उपाध्यक्ष ऍड. रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content