नांदेड (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी नांदेड येथून मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे.
अशोक चव्हाण यांचा कोरोना टेस्टसाठी स्वॅबचे नमुणे पाठवण्यात आले होते. ते रविवारी पॉझिटिव्ह आले.त्यानंतर त्यांना उपचारासाठी नांदेड येथून मुंबईला नेण्यात आले. नांदेड जिल्ह्यात रविवारी कोरोना व्हायरसचे एकूण दोन नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे, आता जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 127 झाली आहे. तत्पूर्वी राज्य सरकारचे आणखी एक मंत्री जितेंद्र आव्हाड यांना देखील कोरोनाची लागण झाली. ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत.