Home राजकीय माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे भाजपमध्ये दाखल

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे भाजपमध्ये दाखल

0
53

जालना प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे.

लक्ष्मणराव ढोबळे हे गत काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर नाराज होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची कुचंबणा होत असल्याची खंत त्यांनी अनेकदा जाहीरपणे व्यक्त देखील केली होती. यातच गेल्या वर्षी ते केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या पाया पडत असल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यामुळे ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली होती. या पार्श्‍वभूमीवर जालना येथे आज आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये लक्ष्मणराव ढोबळे यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश घेतला.

लक्ष्मणराव ढोबळे हे सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. सोलापूर लोकसभा सीट वरून ते भाजपतर्फे लढण्याची शक्यता आहे. अन्यथा असे न झाल्यास मोहोळ या विधानसभा मतदारसंघावर त्यांचा दावा असणार आहे. ढोबळे हे मातंग समाजातील ज्येष्ठ नेते असल्यामुळे भाजपची ताकद आगामी निवडणुकीमध्ये वाढणार असल्याचे मानले जात आहे यांच्या भाजपमधील आगमनाने या पक्षाची ताकद नक्कीच पडल्याचे मानले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound