रावेर, राजकीय विश्लेषण, शालिक महाजन । माजी मंत्री एकनाथराव खडसे हे घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करतील अशी सर्वत्र चर्चा असतांना रावेर तालुका भाजपात मात्र सद्या स्थिती संभ्रमाचे वातावरण आहे. खडसे सोबत जायच की भाजपात थांबायच यावर सद्या तरी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या मनात मंथन सुरु आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना मानणारा वर्ग रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. भाजपाचे रावेर पंचायत समितीला आठ सदस्य असून सभापती देखिल आहे. सावदा नगर पालिकेत भाजपाचे नऊ नगर सेवक तर एक नगराध्यक्ष आहे. जिल्हा परिषदचे चार सदस्य असून झेडपी अध्यक्षा सुध्दा रावेर तालुक्यातीलच आहे. रावेर पालिकेत तीन नगरसेवक, बाजार समितीत आठ संचालक तर एक सभापती देखील भाजपा पुरूस्कृत आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपाची पकड चांगली असून अनेक महत्वाचे संस्था भाजपाच्या ताब्यात आहे.
यामध्ये अनेक पदाधिकारी माजी मंत्री खडसे गटाचे आहे. आमच्या प्रस्तुत प्रतिनिधीनी रावेर भाजपातील काही पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना खडसे पक्ष प्रवेशाबाबत त्यांच मत जाणून घेण्याच्या प्रयत्न केला असता. काही खडसे सोबत दिसले तर काही भाजपा सोबत तर काहीनी खडसे भाजपाच सोडणार नसल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. त्यामुळे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी खरच पक्षांतकेले तर रावेर तालुका भाजपात कशी आणि काय-काय उलथा-पालथ होते याकडे सर्वांचे लक्ष असेल. सद्या तरी सर्वांचे लक्ष माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या निर्णयाकडे लागले आहे.
माजी मंत्री खडसेंचा रावेरवर सुध्दा प्रभाव
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर प्रमाणे रावेर तालुक्यावर सुध्दा त्यांची पकड आहे. पंचायत समिती जिल्हा परीषद असो की नगर पालिका, बाजार समिती या प्रत्येक ठिकाणच्या महत्वाच्या पदावर नाव नियुक्तीसाठी स्थानिक भाजपा पदाधिकारी खडसे यांचा सल्ला घेऊनच नाव निश्चित केले जात होते. परंतु, आता पुला खालून बरेच पाणी वाहून गेले असून खडसे राष्ट्रवादीत प्रवेश केला तर पुढील वर्षी तालुक्यात बाजार समिती,नगर पालिका,खरेदी विक्री, जिल्हा बँक सारख्या संस्थाच्या निवडणुका असून येथे खडसे आपले माणसे निवडून आणण्यासाठी बराच प्रयत्न करतील.
तालुक्यात राष्ट्रवादीला मिळेल संजिवनी
तालुक्यात सद्या राष्ट्रवादीचे दोन पंचायत समिती सदस्य तर एक जिल्हा परीषद सदस्य आहे.सद्या स्थिती राष्ट्रवादीत मराठा पुढा-यांचा बोलबाला राहिलेला आहे.तालुक्यात लेवा पाटील समाज मोठ्या प्रमाणात असून त्या खालो-खाल मराठा नंतर मुस्लिम बुध्दिष्ट नंतर बाकी अल्पसंख्या समाज आहे.खडसे राष्ट्रवादीत गेले तर लेवा समाजासह इतर अल्पसंख्या समाज खडसे राष्ट्रवादीकडे वळविण्याची ताकद खडसे यांच्या कडे आहे. त्यामुळे तालुक्यात खडसेमुळे राष्ट्रवादीला चांगला ताकद मिळेल.
भाजपाकडे खिंडार रोखण्याची जबाबदारी
खडसे राष्ट्रवादीत गेले तर भाजपा’ला सर्वात मोठी जबाबदारी व टेंशन असेल ते आपले पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना भाजपा सोबत ठेवण्याची आधीच भाजपामध्ये खडसे गट महाजन गट भाजपावर प्रेम करणारे असे तिन्ही गट सक्रीय आहे. यासाठी खास आ गिरीष महाजन आ राजूमामा भोळे हे स्वता: रावेर पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्याशी जवळीक साधून संर्पकात आहे.भाजपाला तालुक्यात खिंडार पडू नये यासाठी व्यूरचनेत आहे.तर खडसे जास्तीत-जास्त भाजपाला खिंडार पाडण्यासाठी जिव्हाळीच्या लोकांना सोबत घेतील.