पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील करंजी येथे दि. ४ रोजी झालेल्या ढग फूटी होऊन अनेकांचे घरे जमीनदोस्त होवून अनेकांचे आर्थिक नुकसान झाले होते. अशा नुकसानग्रस्त कुटुंबियांना माजी पालकमंत्री सतीश पाटील यांनी स्वर्चाने संसार उपयोगी साहित्याचे वाटप केले.
दि. ४ ऑगस्ट रोजी करंजी येथे प्रचंड प्रमाणात पाऊस होऊन शेती शिवारातील पाणी हे गावात आल्याने अनेक घरे जमींनदोस्त झाली. पाण्याचा प्रवाह इतका होता की, सर्व संसार उपयोगी वस्तु पाण्यात वाहून गेल्या. अनेक परिवार बेघर झाले. माजी पालकमंत्री सतिश पाटील यांनी त्या कुटुबांना संसार उपयोगी साहित्य देवून मदतीचा हात दिला. या साहित्य वाटपा प्रसंगी करंजी सरपंच भैयासाहेब रोकड़े, माजी सरपंच आधार माळी, माजी सरपंच संतोष पाटील, माजी सरपंच भैयासाहेब पाटील, शालेय समिती अध्यक्ष विलास रोकड़े, गुलावराव पाटील, विशाल रोकड़े, प्रमोद रोकड़े , वि वि,का,चेअरमन माधवराव पाटील, दशरथ महाजन, रमेश भील, शरद भील, प्रकाश माळी, आबा माळी, दत्तु माळी ,किरण पाटील, योगेश रोकडे , धनंजय रोकडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.