वेल्लोर (वृत्तसंस्था) माजी पंतप्रधान राजीव गांधींची मारेकरी नलिनीने सोमवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नलिनी गेल्या २९ वर्षांपासून तामिळनाडूमधील वेल्लोर कारागृहात शिक्षा भोगत आहे. तिथेच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. वकिलांनी पुढे सांगीतले की, नलिनीचे अन्य एका कैद्यासोबत भांडण झाले. यानंतर इतर कैद्यांनी हे प्रकरण जेलरपर्यंत नेले. यानंतर नलिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान राजीव गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी दोषी नलिनीसोबत कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तिच्या पतीने फोन करुन नलिनीला दुसऱ्या कारागृहात हलवले जावे अशी मागणी वकिलाकडे केली आहे. दरम्यान, नलिनीचे वकिलाने आताम्हत्येच्या वृत्ताला दुजोरा दिला असून गेल्या २९ वर्षात पहिल्यांदाच नलिनीने अशा पद्धतीचे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले.