अमळनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील मांडळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र धनगर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
मांडळ ग्रामपंचायतीची दि. ३१ ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा विनिमय करण्यात आली. त्यात तंटामुक्ती समितीचा कार्यकाळ संपल्याने नवीन कार्यकारणी गठीत करण्यांत आली. यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र अण्णा धनगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांचे सर्वत्र स्तरातून अभिनंदन केले जात आहे. या ग्रामसभेला सरपंच विद्या पाटील, उपसरपंच हंसराज मोरे, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, माजी सरपंच किरण जैन, ग्रामसभेचे अध्यक्ष माजी सरपंच डॉ. अशोक पाटील, नथ्थु पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन पवार, सुरेश कोळी, विजय पाटील, विजय कोळी, दीपक बडगुजर, संतोष पाटील, भाऊराव पाटील, संतोष कोळी, रोहित पाटील, मंगलदास कांबळे, जितेंद्र पाटील, रावसाहेब कोळी, ग्रामपंचायत सदस्य डॉ. दीपक पाटील, मा पो पा भास्कर पाटील सह ग्रामस्थ उपस्थित होते.