चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नेताजी पालकर चौकात राहणाऱ्या एका महिलेच्या घरातून सात लाख रूपये किंमतीचे दागिने लांबविल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, नेताजी पालकर चौकात एक महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास महिला नातवाला घेवून बाहेर गेली असता त्यांच्या घरातून चोरट्यांनी घरातून सात लाख रूपये चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आव्हाडे, ढिकेले, पो.ना. राहूल सोनवणे, पंढरीनाथ पवार, निलेश पाटील, विनोद खैरनार आणि अमोल भोसले यांनी तांत्रिक व सीसीटीव्हीच्या आधारे रविंद्र रघुनाथ गोसावी रा. ठाणगाव ता. सिन्नर, ह.मु. नाशिक यासह त्याची पत्नी आणि इतर दोन महिला अशा एकुण चार जणांना पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील ५ लाख ९७ हजार रूपये हस्तगत केले आहे. चौघांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनिरी सुहास आव्हाड, पो.ना. राहूल सोनवो, अमोल भोसले, विनोद खैरनार, शरद पाटील आदी करीत आहे.