जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात बंद घराचे कुलूप तोडून घरातून टी.व्ही., फ्रीजसह इतर ३५ हजार रूपये किंमतीच्या सामांनांची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत गुरूवार ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कृष्णाबाई भैरूला ओडीया (वय-४८) रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव या महिला परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. २४ जानेवारी रोजी त्या घर बंद करून बाहेरगावी गेलेल्या होत्या. महिलेचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील टीव्ही, फ्रीज, गॅसच्या दोन हंड्या, लाकडी कपाट, स्टीलचे भांडे, स्पीकर्स असा एकुण ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. गुरूवारी ९ फेब्रुवारी महिला घरी आल्यावर त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप व कडी कोयंडा तोडलेला दिसून आला. महिलेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील करीत आहे.