महिंदा राजपक्षेंच्या पक्षाला दोन तृतीयांश बहुमत ; मोदींनी केले अभिनंदन !

कोलंबो (वृत्तसंस्था) पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टीने सार्वत्रिक निवडणुकीत २२५ सदस्यांच्या संसदेत एसएलपीपीने एकट्याने १४५ जागा जिंकल्या आणि मित्र पक्षांनी मिळून एकूण १५० जागा जिंकल्या. अशा प्रकारे या पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील राजपक्षे यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.

 

एसएलपीपी पक्षाला ६८ लाख म्हणजेच ५९.९ टक्के मते मिळाली. या जोरदार विजयामुळे पुन्हा एकदा श्रीलंकेत महिंदा राजपक्षे परतणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील राजपक्षे यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यासाठी काम केले जाणार असल्याचेही मोदी म्हणाले. राजपक्षे यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. फोनवरून अभिनंदन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. श्रीलंकेतील नागरिकांच्या सोबत दोन्ही देशांमधील अनेक वर्षांपासून असलेले उत्तम संबंध आणि सहकार्य यांना पुढे नेण्यास एकत्र काम करण्यासाठी मी उत्साहित आहे. श्रीलंका आणि भारत हे चांगले मित्र आणि उत्तम सहकारी राष्ट्र आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, श्रीलंका आणि भारत चांगले मित्र आणि सहयोगी आहेत. महिंदा राजपक्षे यांना चीन समर्थक म्हणून ओळखले जात असल्यानं ते भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात.

Protected Content