गोरक्षकांवर ओवेसींचा आक्षेप

नवी दिल्ली , वृत्तसेवा । लोकसभेचे खासदार आणि अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी कथित गोरक्षकांच्या हल्ल्यांबाबत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. गोरक्षकांची दहशत मुस्लिमांना आपल्या जीवाला धोका असल्याची जाणीव करून घेण्यास भाग पाडत आहे, असे ओवेसी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

असे हल्ले करणाऱ्यांना केंद्र सरकारचे मंत्री पुष्पहार घालतात, असेही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी हरियाणाच्या गुरुग्राममध्ये गोरक्षकांनी मांस घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला कथित मारहाण केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई देखील केली होती.
, ‘गोरक्षकांची दहशत मुस्लिमांमध्ये आपल्या जीवाला धोका असल्याची भावना विकसित करण्यास भाग पाडत आहे. या जमावावर त्वरित कारवाई व्हावी आणि त्यांना शिक्षा व्हायला हवी. असे करण्याऐवजी केंद्र सरकारच्या काही मंत्र्यांनी त्यांना पुष्पहार घातले. तसेच इतर काही प्रकरणांमध्ये गडबड देखील करण्यात आली. यामुळे अर्थातच त्याचे धैर्य वाढेल हे स्पष्टच आहे.’

Protected Content