यावल प्रतिनिधी । महाविकास आघाडीने कर्जमाफीच्या नांवाखाली शेतकऱ्यांची फसवणुक झाली आहे, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांनी केले. येथील तहसील कार्यालयाच्या आवारात भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीभाउ जावळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी शासनाच्या गोंधळलेल्या कारभाराच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार हरीभाउ जावळे, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी, ज़िल्हा परिषद शिक्षण समितीचे सभापती रविंद्र सुर्यभान पाटील यांंनी महाविकास आघाडी ही महाभकास आघाडी असल्याचे सांगून हे शासन शेतक-यासह जनतेची दिशाभुल करीत असल्याचा आरोप केला आहे. निवडणूकीआधी संपुर्ण शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची भाषा महाविकास आघाडी शासना केली होती. मात्र प्रत्यक्षात गावा-गावातून बोटावर मोजण्या इपत शेतक-यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळतो आहे. असे सांगीतले तिन भिन्न मिन्न विचाराचे शासन आल्या पासुन राज्यात महीलांवर अत्याचाराच्या घटनेत वाढ झालेली असल्याने महीलाच्या मनात असुरक्षतेची भावना निर्माण झाल्याचे त्यांनी सांगीतले.
खरेदी विक्री संघाचे संचालक नरे्रद नारखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण शशीकांत चौधरी, उज्जेनसींग राजपुत, माजी जि.प.सदस्य हर्षल पाटील, भाजपाचे यावल शहराध्यक्ष निलेश गडे, भाजपाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत महाजन, राकेश फेगडे, गणेश नेहेते, पं.स. सभापती पल्लवी चौधरी, मीना तडवी, जि.प. सदस्या सविता भालेराव, देविदास पाटील वसंतराव भोसले, किशोर कुळकर्णी, डॉ .नरेंद्र वामन कोल्हे यांचेसह तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने या धरणे आंदोलनात उपस्थीत होते. तहसीलदार जितेंद्र कुवर यांना निवदेन देण्यात आले पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी आपल्या कर्मचारी सह बंदोबस्त चोख ठेवला .