धरणगाव, प्रतिनिधी । येथील महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघातर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला २५००० रुपयांची मदत देण्यात आली आहे.
महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रदेश सरचिटणीस सुभाष झेंडू भावसार यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला चेक देण्यात आला. सध्या कोरोना या .विषाणुमुळे समाजावर आर्थिक संकट कोसळले असून त्या संकटाचा सामना करण्यासाठी गोरगरिबांना मदत व्हावी या हेतूनेही मदत देण्यात आली आहे. धरणगाव तालुक्याचे मा. तालुका संघचालक मोहन चौधरी सर यांच्या हस्ते मदत स्वीकारण्यात आली. यावेळी जनकल्याण समितीचे ललित उपासनी, केदार अण्णा तसेच जिल्हा कार्यवाह किशोर चौधरी, दिलीप पवार, समाधान मोरे व चंदू भावसार उपस्थित होते.