महाराष्ट्र राज्य इंजिनीअरिंग कृती समितीतर्फे आ.शिरीष चौधरी यांना निवेदन

 

यावल, प्रतिनिधी । येथील इंजिनीअरिंग कृती समिती महाराष्ट्र राज्यच्या वतीने यावल तालुकाध्यक्ष मयूर सुरेश सोनवणे यांनी आमदार शिरिष चौधरी यांना अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची माहिती देत त्यावर शासनाच्या माध्यमातुन गांर्भीयांने विचार व्हावा आणि शासनातर्फे तरतूद व्हावी ही विनंती एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

इंजिनीअरिंग कृती समिती महाराष्ट्र राज्य मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात प्रामुख्याने महाविद्यालयातील विविध विभागांच्या व विविध कार्यक्रमांच्या आवश्यक नसणाऱ्या फी माफ करण्याबाबत आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील ट्युशन फी मध्ये विद्यार्थ्यांना सरकार तर्फे २०% सवलत मिळण्याबाबत विनंती केली. या निवेदनात कोविड-१९ मुळे समस्त पालकवर्गाची आर्थिक बाजू कमजोर झाली असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर असणाऱ्या इतर समस्यांबाबत देखील चर्चा झाली. अभियांत्रिकी शिक्षक व कर्मचारी यांच्या समस्यांवर चर्चा झाली. यावेळी इंजीनिरिंग कृति समिति यावल तालुकाध्यक्ष मयूर सुरेश सोनवणे यांच्या सोबत इंजीनिरिंग कृती समितीचे निखिल जावले, भूषण राणे, पराग कुरकुरे हे प्रामुख्याने उउपस्थित होते.

Protected Content