
बोदवड (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते भूषण प्रकाश नेरकर यांची महाराष्ट्र माळी महासंघाच्या बोदवड तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र माळी महासंघ प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांच्या आदेशानुसार व विश्वस्त मंडळाच्या मान्यतेने तसेच जळगाव जिल्हा अध्यक्ष आप्पा महाजन व खान्देश विभागीय अध्यक्ष सचिन महाजन यांच्या शिफारशीने भूषण नेरकर यांची महाराष्ट्र माळी महासंघाच्या बोदवड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी बोदवड माळी समाजाचे अध्यक्ष कैलास माळी,प्रभाकर महाजन, दिलीप माळी, दिनेश माळी ,नामदेव नेरकर,रामधन माळी, विजय माळी, आबा माळी, तेजस नेरकर,पंकज नेरकर, संजय माळी,विलास माळी, अनिल माळी, ज्ञानेश्वर घोगले,या समाजातील नागरिक उपस्थित होते.


