जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र ऑलिम्पिक हॉकी स्पर्धा पुणे येथे सुरू झाल्या असून त्यात महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट पहिल्या आठ संघात हॉकी जळगावचे मुलं आणि मुली दोघी संघ पात्र ठरले आहे. या स्पर्धेसाठी दोन्ही संघ रवाना झाले आहे.
हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष प्रा. डॉ अनिता कोल्हे, हॉकी जळगावचे सचिव फारुख शेख, सहसचिव तथा मध्य रेल्वेचे राष्ट्रीय खेळाडू अकिल शेख यांच्याहस्ते निरोप देण्यात आला. यात मुलींच्या संघात खुशी श्रीवास्तव, रोशनी राठोड, रोहिणी सुतार, दिव्या शिंपी, सरला अस्वार, गायत्री अस्वार, वैष्णवी चौधरी, आश्विनी वांडोले, रूपाली अस्वार, आरती ढगे, विद्या खरोटे, निकिता पवार, उर्मिला पाटील, निशा कोंढाळकर, वर्षा सोनवणे, भाग्यश्री कोळी, हिमाली बोरोले, कोमल सोनवणे यांचा समावेश होता. तर मुलांच्या संघात चेतन माळी, शेख नदीम खान जुबेर, सय्यद शादाब, शेख मुजफ्फर, शेख इमरान, शेख अल्तमश, साहिल पटेल, खान अकील, मोहम्मद आवेज, कुरेशी नदीम, शेख आरिफ, अकबर पठाण , शेख मोहसीन, करण ठोसरे, रियाझ कुरेशी, फिरोज तडवी, मोहम्मद तौसीफ यासह टीम मॅनेजर मजाज खान, आवेश खाटीक, कोच सत्यनारायण पवार, सय्यद लियाकतअली यांच्यासह आदींचा सहभाग आहे.