Home राज्य महाराष्ट्राला ४,७१४ कोटी रूपयांची मदत

महाराष्ट्राला ४,७१४ कोटी रूपयांची मदत

0
34

मुंबई प्रतिनिधी । दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारने ४,७१४ कोटी रूपयांची विशेष मदत जाहीर केली आहे.

देशातील सहा राज्यांना आज केंद्र सरकारने मदत जाहीर केली आहे. यात महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधीक म्हणजेच ४७१४ कोटी रूपयांची मदत जाहीर झाली आहे. या माध्यमातून राज्य सरकार दुष्काळ निवारणाच्या विविध योजना अंमलात आणू शकणार आहे. राज्यात यंदा अत्यंत भयावह दुष्काळ पडला असून यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागण्यात आली होती. या अनुषंगाने आज केंद्र सरकारने ही मदत जाहीर केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound