मुंबई (प्रतिनिधी) राज्यात लॉकडाऊनला ३१ मे पर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आलीय. याबाबत आज अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करतांना लॉकडाऊन ४.० अनिवार्य असल्याची घोषणा केली होती. १८ मे च्या आधी याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. या अनुषंगाने राज्य सरकारतर्फे देखील लॉकडाऊनला मुदतवाढ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. याबाबत आज नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले. त्यानुसार आता महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.
मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्या स्वाक्षरीने जारी आदेशात 31 मे पर्यंत पूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आलीय. आपत्कालीन व्यवस्थान कायदा 2005 आणि साथरोग नियंत्रण कायदा 1897 नुसार राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन अजॉय मेहता यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड 19 चा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात 31 मे 2020 च्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊनची स्थिती वाढवणं गरजेचं असल्याचंही अजॉय मेहता यांनी या आदेशात म्हटले आहे. आधीच्या लॉकडाऊनमध्ये कोविड 19 चा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्स आता 31 मे 2020 पर्यंत लागू राहणार आहेत. दरम्यान, लॉकडाऊन ४ मध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, प. बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगण, आंध्र प्रदेश, पंजाब व ओडिशातील ३० हून अधिक पालिकांत पूर्ण बंधने राहू शकतात. यात बृहन्मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, ठाणे, दिल्ली, इंदूर, कोलकाता, जयपूर, नाशिक, जोधपूर, आग्रा, उदयपूर, मीरत अशा २ राज्यांतील ३० पालिका हद्दीत कठोर बंधने केंद्र सरकार कायम ठेवणार असल्याचे कळते. याबाबत लवकरच केंद्र सरकार अधिकृत घोषणा करणार आहे.